परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

मंगळवार, 21 मे 2024 (17:07 IST)
सध्या राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. तापमान वाढल्यामुळे उष्णतेत झळा तीव्र होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे उष्मघाताचा त्रास होऊन एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना परळी येथे घडली असून महादेव संभाजी गुट्टे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. 

देशभरातील वाढती उष्मा आणि उष्णतेच्या लाटेबाबत सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या उष्णतेचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो, काही लोकांमध्ये यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. विशेषत: वृद्ध लोक आणि लहान मुलांनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

राज्यात काही ठिकाणी उन्हाची तीव्रता जास्त आहे. तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहे. बीड जिल्ह्यात देखील काही दिवसांपासून उकाडा वाढत आहे. परळीच्या भाजीपाला बाजारात दररोज प्रमाणे महादेव संभाजी गुट्टे हे भाजी विकायला आले असता त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. 
त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉटरांनी सांगितले.

Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती