Vegetable Price Hike : पाऊस लांबल्याने भाजीपाला महागला

मंगळवार, 20 जून 2023 (12:46 IST)
पाऊस लांबणीवर गेल्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाल्यावर दिसू लागला आहे. शेजारच्या राज्यातून येणाऱ्या भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्यामुळे वधारलेल्या भावाने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. टोमॅटोचे भाव वधारले असून टोमॅटो 45 ते 60 रुपये किलोने विकला जात आहे. 

सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक रायपूर, भिलाई, दुर्ग, संगमनेर, नाशिक, बेंगळुरू, पंढरपूर होत आहे. येत्या काही दिवसांत सण वार सुरु होणार असून वाढत्या उन्हाळ्याला पाहता स्थानिक माल येणास उशीर होणार असून भाजीपाल्याचे दर अजून वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पाऊस लांबणीवर गेल्यामुळे उकाडा वाढत आहे त्याचा परिणाम भाजीपाल्यावर दिसत आहे. भाजीपाल्याची स्थानिक आवक घटली असून बाहेरून भाजीपाला येत असल्यामुळे भाजीपाला जास्त दराने घ्यावा लागत आहे. 
दररोज जेवण्यासाठी आवश्यक असलेल्या भाज्यांचे दर वधारले आहे. वांगी, मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची, गवार, चवळी, भेंडी, कारली या भाज्या 25 ते 50 रुपये प्रति किलोच्या दराने मिळत आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती