वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात, कोणतीही जीवितहानी नाही

शनिवार, 10 जुलै 2021 (22:04 IST)
शालेय शिक्षणमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात झाला  आहे. वर्षा गायकवाड यांच्या गाडीला एका पिकअप टेम्पोने मागून जोरदार धडक दिली हा अपघात घडला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच वर्षा गायकवड यादेखील पूर्णपणे सुरक्षित आहेत. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. 
 
हिंगोलीच्या पालकमंत्री असलेल्या वर्षा गायकवाड या ९ जुलै रोजी हिंगोलीच्या दौऱ्यावर जात होत्या. दरम्यान नियोजित दौऱ्यानुसार जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी शहरातील रामलिला मैदानाची पाहणी करत वाहनांचा ताफा पुढील प्रवासासाठी निघाला. याचवेळी दुपारी २.३० च्या सुमारास पिपल्स बँकेजवळील एका धावत्या पिकअप टेम्पोने त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला धडक दिली, परंतु कार चालकाने प्रसंगावधान राखत कारचा वेग वाढवला यामुळे टेम्पोने कारच्या मागील भागांस येऊन धडकला. यामुळे वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा ताफा काही वेळ रस्त्यावरचं थांबला होता. परंतु वाहनांची तपासणी करत ताफा पुन्हा पुढील नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती