वज्रमूठ सभा : हे अवकाळी सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार - आदित्य ठाकरे
सोमवार, 1 मे 2023 (21:33 IST)
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा मुंबईत सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार या सभेत काय बोलणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. रत्नागिरीतील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कोकणवासियांचं मोठं आंदोलन सुरू आहे. यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार - आदित्य ठाकरे
थोड्या दिवसांचा खेळ आहे, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार - आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, "हे अवकाळी सरकार आहे. शेतकऱ्यांचे ऐकायला एक मंत्री नाही. गुजरात आणि महाराष्ट्र एक दिवस स्थापना झाली. पण गुजरात दोन मुख्यमंत्री मिळाले आहेत."
"शिवसेनेनं ज्यांना मोठं केलं, ते साथ सोडून गेले. पण तुम्ही सोबत राहिलात. तुमचे मनापासून आभार मानतो," असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
संजय राऊत वज्रमूठ सभेत काय म्हणाले?
* दादांचं सगळ्यांना आकर्षण आहे, दादा येणार की नाही, असं विचारलं जातंय. दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार
* या देशाचा पंतप्रधान फक्त मन की बात करतोय, काम की बात करत नाहीय
* ही वज्रमूठ सबा काम की बात करेल.
* मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी शिवसेनेवर घाव घातला गेला.
* ही शिवसेना या मुंबईत पाय रोवून उभी राहील आणि तुमचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही.
* काही बोललो की आत टाका, मी आत जाऊन आलोय, तुमच्या बापाला घाबरत नाही.
* ही वज्रमूठ नसून, हे मजबूत मनगट आहे. हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा