पुढील पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; गारा पडण्याची शक्यता!

शनिवार, 25 डिसेंबर 2021 (21:55 IST)
संध्या देशातील अनेक भागात थंडीची लाट पसरली असून, लोक गुलाबी थंडीचे दिवस अनुभवत आहेत. देशातील काही भागांमध्ये तर गारठणारी थंडी असल्याने, परिस्थिती बिकट आहेत. यंदा वेळी-अवेळी बरसत असलेल्या पावसामुळे डिसेंबरच्या मध्यातरांत हिवाळा सुरू झाला असे म्हटले तर चुकीचे ठरु नये. त्यामुळे उशिरा आलेल्या थंडीची लाट आता सर्वत्र बघावयास मिळत आहे.
 
दरम्यान, २४ डिसेंबरपासून पुढील पाच दिवसांत देशात अनेक राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २४ आणि २५ डिसेंबर रोजी जम्मू-काश्मीर आणि लद्दाख येथे, २४ ला हिमाचल प्रदेशात, तर २६ ते २९ डिसेंबरदरम्यान पंजाब, हरयाणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, सिक्कीम, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. जम्मू-काश्मीरच्या काही भागांत २६ ते २८ डिसेंबरदरम्यान गारा पडण्याची शक्यता आ
हे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती