दोन कारचा भीषण अपघात एक महिला जगीच ठार तर दोन चिमुकल्यांसह ६ जण गंभीर

शनिवार, 25 डिसेंबर 2021 (21:52 IST)
बारामतीकडून नगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हुंडाई कारची व नगर कडून दौंडच्या दिशेने जाणारी हुंडाई कंपनीच्या दोन कारची समोरासमोर झालेल्या धडकेत एक महिला ठार झाली. तर लहान मुलांसह सहजण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव फाट्यावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबत सविस्तर असे की तालुक्यातील पारगाव पारगाव फाट्यावर सकाळी बारामतीकडून नगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या हुंडाई कंपनीची एलेंट्रा कार (क्र.एमएच ४२ वाय ३००१) आणि नगर कडून दौंडच्या दिशेने जाणारी हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी कार (क्र. एमएच १२ जीव्ही २३७०) यांच्यात सामोरा समोर भीषण धडक झाली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. दोन लहान मुलांपैकी एकाला गंभीर दुखापत झाली असून, यात एकूण ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या सर्व जखमींना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती समजल्या नंतर उशिरा बेलवंडी तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती