उल्हासनगरच्या महापौरांना मराठी येत नाही

ज्या राज्यात आपण राहतो तेथील मातृभाषा आलीच पाहिजे. मात्र असे अनके असतात की ते ती शिकत नाहीत. तर राज्यात नेहमीच हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरु असतो असाच प्रकार समोर आला असून, लोप्रतीनिधीला त्यात ही शहराच्या महापौरांना मराठी येत नाही, त्यामुळे संताप आणि हे काय प्रश्न सोडवणार अस नागरिक विचारात आहेत.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकाने महापौर पंचम कलानी यांनी अजब पवित्रा घेतला आहे. मला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोला असे त्यांनी एका नगरसेवकाला म्हटले आहे.‘महापौरांची भेट दुर्मिळ झाली आहे, फक्त मोठ्या माणसांना महापौर भेटतात’ अशी तक्रार एक नगरसेवक  यावेळी  बोलून दाखवत होते.  तेव्हा "आपल्याला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोला"  असे महापौर पंचम कलानी यांनी म्हटले.

महाराष्ट्राची राजभाषा मराठी असून राज्यात सर्व प्रशासकीय कामे ही मराठी व्हावी असा कायदा आहे. परंतु खुद्द महापौरांनाच मराठी येत नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भविष्यात नागरिकांचे प्रश्न सोडवणार की मला मराठी कळले नाही अशी सबब देतात असे नागरिक विचारात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती