रस्त्यावर पाळीव कुत्र्याची त्या गोष्टीमुळे हजारो रु मालकाला दंड

हो आता पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला नेणं काही मालकांना चांगलेच महागात पडले असून, कुत्र्यांनी रस्त्यावर केलेल्या ‘शी’मुळे मालकांना दंड भरावा लागत असून, मुंबई पालिकेने ४ डिसेंबर ते आतापर्यंत अनेक कुत्र्यांच्या मालकांकडून ६२ हजार रुपये एवढा दंड वसूल केलाय. रस्त्याच्या बाजूला अनेकदा मालक आपल्या पाळीव कुत्र्यांना शौचासाठी घेऊन जातात आणि उघड्या विष्ठेवर माशा बसून त्यामुळे रोग पसरतात, याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने जर कुत्र्याने रस्त्यावर शी केली तर ती मालकानेच उचलावी असा आदेश दिला आहे. 
 
मात्र तसं न केल्यास मालकांना दंड भरावा लागत असून, तसंच ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट  केले आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन (एसडब्लूएम) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १८ दिवसांत कुत्र्यांना शौच करण्यासाठी वापरले जाणारे स्कूपर ( विष्ठा उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण) न वापरल्यामुळे, १२४ मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा आवडता डॉगी तुम्हाला आर्थिक झळ देवू शकतो, त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि तसे इतरांना सुद्धा सांगा असे आवाहन मनपाने केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती