उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्यात नाणार रिफायनरीवर चर्चा

शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018 (09:11 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षावर जाऊन भेट घेतली. बैठकीनंतर 
कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला जर ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी ठाकरे यांना दिले आहे.  यावेळी त्यांच्यासोबत नाणार रिफायनरी विरोधातल्या ग्रामस्थांचं शिष्टमंडळ तसंच उद्योगमंत्री सुभाष देसाई, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, वैभव नाईक, राजन साळवी आणि सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील वर्षावरील बैठकीला उपस्थित आहे. 
 
यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे नाणार प्रकल्पाला असहमती दर्शवणाऱ्या पत्रांचे गठ्ठे सुपूर्त केले. आणि या प्रकल्पाला शिवसेनेचाही विरोध असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं.त्यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड जवळपास 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. यआधी दोन प्रमुख नेत्यांमध्ये आगामी निवडणुकीतील फेरयुतीबाबत तर काही चर्चा झाली नाहीना,यावरून राजकीय तर्कवितर्कांना उधान आले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती