आता १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात निघणार

शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018 (09:06 IST)

१५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात किंवा निकाली काढण्यासाठी सरकार योजना आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. वाहनांमुळे वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी सरकार हे पाऊल उचलणार आहे. सदरच्या योजनेबाबत निती आयोगाशी चर्चा झाली असून लवकरच अंमलबजावणी होईल असे गडकरी यांनी सांगितले आहे.

भारत वाहन उद्योगासाठी वाहनांचे पार्ट्स भंगारापासून बनवले जातील. यामुळे वाहनांसाठी लागणारा कच्चा माल स्वस्त मिळेल. भंगारात गेलेलं प्लास्टिक, रबर, अॅल्युमिनियम, तांब्याचा उपयोग वाहनांचे पार्ट्स बनवण्यासाठी वापरले जातील असेही स्पष्ट केले आहे. सोबतच प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच इथेनॉल आणि पेट्रोल दोघांवर चालणारी बाईक लॉन्च करण्यात येणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती