बेस्टच्या ताफ्यात 450 खासगी बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावावरून उफाळलेला वाद औद्योगिक न्यायालयात पोहोचला असून न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत बंद, संप वा तशाप्रकारचे कोणतेही आंदोलन करण्यास कर्मचार्यांना मनाई केली आहे.
या मनाई आदेशानंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीने बुधवारी मध्यरात्रीपासूनचा प्रस्तावित संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बेस्ट समिती आणि कर्मचारी कृती समिती यांच्यात दुपारी झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर बेस्ट प्रशासनाने संप टाळण्यासाठी औद्योगिक न्यायालायात धाव घेतली. बेस्ट प्रशासनाच्या तक्रारीवर (तक्रार क्र. 62/2018) न्यायालयाने तातडीने सुनावणी घेत संपास मनाई केली आहे.