मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचक पोस्ट, तीनचाकी सरकारचा ‘चालक’ मीच!

सोमवार, 27 जुलै 2020 (16:27 IST)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांमधील सर्वच वरिष्ठांनी सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
मात्र, आपल्या राजकीय फटकेबाजीने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यला कारणही तसेच, महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी आणि आल्यानंतर नेते अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात दबदबा कायम ठेवला आहे.
 
दोन दिवसांपूर्वी शिवसेने नेते संजय राउत यांनी घेतलेल्या  एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, सरकार तीन चाकी असले तरी स्टिअरिंग माझ्या हातात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी पोस्ट केलेला फोटो बोलका आहे.
 
या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका गाडीमध्ये बसले आहेत. विशेष म्हणजे, गाडीचे स्टिअरिंग मात्र, अजित पवार यांच्या हातात आहे.
 
दोन-तीन दिवसांच्या फरकांमध्ये दोन्ही नेत्यांच्या कृतीतील हा संदर्भ योगायोग म्हणावी की सूचक संदेश…हे आता आगामी काळच ठरणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती