उद्धव ठाकरे यांना मराठी भाषिकांची मते मिळाली नाही -देवेंद्र फडणवीस

शुक्रवार, 14 जून 2024 (17:40 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले या लोकसभाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना ना मराठी माणसांची मते मिळाली ना उत्तर भारतीयांची. त्यांना ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा त्याग केला त्यांची मते मिळाली.  
 
 शिवसेनेच्या (यूबीटी) उमेदवारांनी मुंबईतील लोकसभेच्या तीन जागा अल्पसंख्याक, बिगर मराठी आणि बिगर हिंदी भाषिकांच्या मतांच्या जोरावर जिंकल्या. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने (UBT) महानगरातील सहा पैकी तीन जागा जिंकल्या तर भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी एका मतदारसंघात विजयी झाले.
 
ते म्हणाले, विरोधकांचा विजय हा सामान्य मुंबईकर किंवा मराठी भाषिकांमुळे किंवा उत्तरभारतीयांमुळे झालेला नाही. ज्यांच्या फायद्यासाठी शिवसेने (यूबीटी) ने लोकप्रिय बाळासाहेबांना  'हिंदूहृदयसम्राट' ऐवजी 'जनाब' वापरण्यास सुरुवात केली त्या लोकांच्या मतां मुळे विरोधक जिंकले.

उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी माझ्या हिंदू भगिनींनो, बांधवानो हे म्हणत भाषणाची सुरुवात करणे थांबवल्याचा दावा फडणवीस यांनी केला.भाजप संविधान बदलणार आहे त्यांना आरक्षण संपवायचे आहे असे खोटे प्रचार विरोधकांकडून करण्यात आले.या मुळे भाजपला मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले.  
 
Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती