उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला नाही, शिवसेनेने वृत्त फेटाळले

सोमवार, 18 जुलै 2022 (08:56 IST)
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. यावेळी शिवसेनेतील ४० आमदार त्यांच्यासोबत गेले. यानंतर अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या. आता सत्तासंघर्षात पक्ष वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी  विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना फोन केला होता अशी चर्चा सुरु आहे. शिंदेंना सोडा आम्ही शिवसेना – भाजप युतीसाठी तयार आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याची जोरादर चर्चा सुरु आहे. दरम्यान हे वृत्त शिवसेनेकडून फेटाळण्यात आले असून या केवळ अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन सत्तासंघर्षात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत शिंदेंना सोडण्यास उद्धव ठाकरेंनी सांगितले अशी चर्चा आहे. यावर आता शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मंत्री आणि फडणवीसांच्या जवळचे माणल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून संपर्क केला असल्याचे सांगितले जात आहे.

फडणवीसांना फोन केल्याच्या बातम्या खोट्या
शिवसेना आणि सरकार वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन चर्च केली अशी माहिती आता समोर येत असताना शिवसेनेने हे वृत्त खोटं असल्याचं म्हणतील आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या बंडानंतर पक्ष वाचविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती