शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाला नवी भरारी देण्यासाठी आणि शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात राजकीय नुकसान झालंय. संघटनात्मक पातळीवरही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी उद्धव यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे.