13 मे रोजी धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसात पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून 17 जणांचा मृत्यू झाला होता , तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. घाटकोपर परिसरातील छेडा नगर येथील पेट्रोल पंपावर 120 फूट x 120 फूट आकाराचा मोठा फलक पडला होता. त्यामुळे ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात लोक आणि वाहने अडकून पडली होती.