एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले

शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (08:00 IST)
एसटी कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ऑक्टोुबर महिन्याचे वेतनही दिवाळीपूर्वी एसटीकडून ST कर्मचाऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. त्यासोबतच महागाई भत्ता आणि दिवाळी अग्रिमची कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे; मात्र गेल्या दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन अद्याप मिळाले नसल्याने, राज्यातील एक लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा दसरा अंधारात जाणार आहे. दरम्यान 2 नोव्हेंबर रोजी राज्यपातळीवर प्रत्येक जिल्हा, तालुका पातळीवर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन दिले जाणार आहे; तर 9 नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबासह आक्रोश आंदोलन करणार आहे. 
 
कोरोना Corona महामारीत एसटी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर प्रवासी सेवेचे काम केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारच्या आदेशानुसार परराज्यातील मजुरांना थेट त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्याची कामगिरी केली; तर अत्यावश्याक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबई उपनगरात प्रवासी सुविधा देत, सध्या मुंबईच्या बेस्ट उपक्रमात सहभागी होऊन बस प्रवाशांची वाहतूकही एसटी कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत; मात्र अद्याप कर्मचाऱ्यांना नियमित वेळेवर वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश आहे. घरखर्च चालवणे कठीण झाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने जुलैचे वेतन ऑक्टोबरमध्ये दिले असले, तरी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे वेतन कामगारांना अद्याप मिळालेले नाही. त्यासोबतच ऑक्टोकबर महिन्याचे वेतनही 7 ऑक्टोरबर रोजी नियमित वेळेवर मिळणे अपेक्षित आहे. 
या आहेत प्रमुख मागण्या 
तीन महिन्यांचे प्रलंबित वेतन 
करारातील तरतुदीप्रमाणे राज्य सरकारला लागू केल्याप्रमाणे महागाई भत्ता 
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे व करारातील तरतुदीप्रमाणे दिवाळी सण अग्रिम 
मागणीप्रमाणे दिवाळी भेट 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती