तुळजापूर: आई तुळजा भवानीचा सोन्याचा मुकुट सापडला

सोमवार, 11 डिसेंबर 2023 (21:41 IST)
तुळजापुरातील आई तुळजा भवानीचा गहाण झालेला सोन्याचा मुकुट सापडला आहे.असा दावा सोनं मोजणी समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्षांनी केला आहे.आई तुळजा भवानीचा हा मुकुट मंदिरातील पितळ्याच्या पेटीत सापडला असल्याची माहिती दिली आहे. 

आई तुळजा भवानीचा हा मुकुट 826 ग्राम वजनाचा असून सोन्याचा आहे. तुळजा भवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी देवी आईच्या तिजोरीतील सोने-चांदी आणि प्राचीन अलंकाराची तपासणी करण्यासाठी 16 सदस्यांच्या समितीची स्थापना केली होती. या समितीने नुकताच हा अहवाल सादर केला. या अहवालात आई तुळजा भवानीचा प्राचीन मुकुट गायब असून त्या ठिकाणी दुसरा मुकुट ठेवण्यात आला असल्याचे नमूद केलं आहे.

तसेच देवी आईचे दररोज वापरण्यात येणारे सोन्या-चांदीचे दागिने, माणिक, पाचू, हिरे, मोती, माणिक आणि अनेक दुर्मिळ अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गहाण झाल्याची माहिती समोर आली. मात्र आता हा गहाण झालेला 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट तुळजाभवानी मंदिरातील पितळी पेटीत सापडल्याचा दावा पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांचा कडून करण्यात आला आहे. या दाव्याने खळबळ उडाली आहे. मात्र मंदिर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 
 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती