बुलढाणा जिल्ह्यातील टुंकी गावाजवळ केळीने भरलेला ट्रक उलटला. अंजनगाव सुर्जी येथील दोन मजूर ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील टुंकी गावाजवळ केळीने भरलेला ट्रक उलटला. या अपघातात अंजनगाव सुर्जी येथील दोन मजूर ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक जळगाव जामोद परिसरातून अंजनगावकडे केळी घेऊन जात होता. टुंकी-सोनाळा रस्त्यावरील एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यात नीलेश चव्हाण आणि बाळू रायबोले यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले.