जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याच्या कारवाईत सामील पोलीस उपयुक्त विनय कुमार राठोड यांची बदली

शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (23:40 IST)
सध्या ठाण्यातील पोलीस दलातील 3 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या  आहेत. त्यात उपायुक्त विनयकुमार राठोड यांची बदली करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याच्या कारवाईत विनय कुमार राठोड यांचा सहभाग होता. विवियाना मॉल मध्ये प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. आव्हाड यांची जामिनावर सुटका झाली आहे. कारवाईच्या वेळी उपायुक्त विनय कुमार यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसून येत होते. त्यात त्यांची काहीही चूक नसे ते त्यांचे कर्तव्य बजावत होते. ठाणेचे उपायुक्त विनय कुमार राठोड यांची परिमंडळ 5 मधून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. तर उपायुक्त सुधाकर पठारे यांची विशेष शाखेतून परिमंडळ 4 मध्ये बदली झाली तर उपायुक्त गणेश गावडे यांची बदली मुख्यालय 2 मधून परिमंडळ 1 ठाणे येथे करण्यात आली आहे. राठोड यांची बदली केल्याने सध्या चर्चा रंगत आहे. या वर जितेंद्र आव्हाड म्हणाले की विनय याना बक्षीस मिळालं असं समजावं.ठाण्यातील वाहतूक शाखेतील पोस्ट महत्त्वाची आहे. त्यांना बढती मिळाली असल्याचं ते म्हणाले. सध्या ठाणेकऱ्यांसाठी ट्रॅफिक विषय महत्त्वाचा आहे. जमिनीवर सुटका झाल्यावर आव्हाड म्हणाले की , मी पोलिसांना दोष देणार नाही पोलिसांनी जे काही केले त्या साठी त्यांच्यावर वरून दबाव होता त्यांनी आपले कर्तव्य बजावले 

Edited  By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती