राज्यात आजचा दिवस पावसाचा, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (08:13 IST)
तेलंगणावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या ६ तासांत १४ ऑक्टोबरलापश्चिमेकडे सरकला आहे. कमी दाबाचा पट्टा सोलापूरपासून (मध्य महाराष्ट्र) ११० किलोमीटर पूर्वेला आहे. कमी दाबाचा पट्टा पुढे पश्चिम-वायव्येकडे सरकत जाऊन पुढील १२ तासांत कमी होणार आहे. त्यानंतर, कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकून १६ ऑक्टोबरलाअरबी समुद्रात महाराष्ट्र किनाऱ्याकडे येईल. महाराष्ट्रात अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आगामी १२ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 
 
१५ ऑक्टोबर : 
कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची (२० सेंमी प्रतिदिन) शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकात पुढील १२ तासांत ३०-४० किलोमीटर ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. सकाळी महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर ४०-५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.
 
१६ ऑक्टोबर : 
संध्याकाळी अरबी समुद्राच्या ईशान्येकडे याचा वेग हळूहळू वाढत जाऊन ४५-५५ किमी प्रतितास ते ६५ किमी प्रतितास एवढा होईल. महाराष्ट्र किनारपट्टीवरील ईशान्य अरबी समुद्र खवळलेल्या स्थितीत असेल. पुढील तीन दिवस मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती