'ठाकरे सरकारच्या राज्यात अंधेर, किरीट सोमय्या यांचा खोचक टोमणा

सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (17:27 IST)
मुंबईतल्या वीज खंडीत होण्याला ठाकरे सरकारला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जबाबदार धरले आहे. किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी 'ठाकरे सरकारच्या राज्यात अंधेर" असा खोचक टोमणा मारत आता वीज गेली त्यासाठी ठाकरे सरकार आणि त्यांच्या वीज कंपन्या जबाबदार आहेत. असा आरोप केला. तसेच, पैसे नसल्यामुळे सप्लाय नाही, रिपेरिंगच्या कामाचे व्यवस्थित नियोजन केले जात नाही आहे त्यामुळेच हे ग्रीड फेल्युर झालेल आहे. असे सांगत ३०० युनिट मोफत देऊ ठाकरे सरकारची फक्त घोषणा, असा आरोपही सोमय्यांनी यांनी केला आहे. 
 
मुंबईला वीजपुरवठा करणार्‍या लाईन्स आणि ट्रान्सफॉर्मर (कळवा-पाडघे आणि खारगर आयसीटीएस) च्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांना ३६० मेगावॅटचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती