मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे शेतात निंदणी करताना एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना गुरुवारी सकाळी चिमूर वन क्षेत्रातील भिसी उपवन क्षेत्रातील गडपिपरी येथे घडली. मृत महिलेचे नाव विद्या कैलाश मसराम ४० असे आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या घटनेनंतर जमाव आक्रमक झाला. दरम्यान, वनरक्षकाच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली.