धरणात बुडून तीन शिक्षकांचा मृत्यू

गोंदिया- १५ ऑगस्ट रोजी सहलीसाठी गेलेल्या चार शिक्षकांपैकी तिघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेले तीन शिक्षकांचा तमांगता धरणात बुडून मृत्यू झाला.
 
एन. मिश्रा (भिलाई), अरविंद सर (उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू (नागपूर) असे या मृतकांची नावे आहेत. हे शिक्षक गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गात शिकवत होते. तिघांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाच्या बाहेर काढून राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 
शिक्षकांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविले जाणार आहे. हे शिक्षक भिलाईतील शिक्षक मित्राच्या आमंत्रणावर राजनांदगाव येथील मांगता धरणावर सहलीसाठी गेले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती