मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघातात तीन जण ठार, दोघे जखमी

शुक्रवार, 31 मे 2024 (20:39 IST)
मुंबई -गोवा महामार्गावर रिक्षा आणि टेम्पोची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहे.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
सदर घटना मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे घडली असून माणगाव कडून इंदापूर कडे जाणारी रिक्षा आणि मुंबईहून माणगावच्यादिशेने जाणारी आयशर टेम्पोची माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळतातच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले .जखमींमध्ये रिक्षा चालक आणि दीड वर्षाच्या मुलीचा समावेश असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती