पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

रविवार, 19 मे 2024 (15:16 IST)
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या लग्जरी कार ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या मध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातांनंतर संतप्त लोकांनी कार चालकाला बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. 
 
सदर घटना शनिवारी रात्री पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली असून  
वेगाने जाणाऱ्या पोर्श कार ने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या मोटारसायकलवर तरुण आणि तरुणी बसलेले होते. कारची मागून धडक लागल्यावर ते दोघे रस्त्याच्या मधोमध पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

या अपघातात कारचे हेडलाईट,काचा,समोरचे तयार फुटले आहे. कार चालक मध्यरात्री पार्टीसाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी कार चालक तरुणाला बेदम मारहाण केली आणि अपघाताची माहिती पोलिसांना दिली. 

पोलीस माहिती मिळतातच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अल्पवयीन तरुण कार चालकाला ताब्यात घेत मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पाठविले असून मृतांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली. 

Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती