महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

शनिवार, 18 मे 2024 (10:08 IST)
पाच लाखांची लाच मागून गुन्ह्यामध्ये पुढे कारवाई न करण्यासाठी तडजोड म्हणून तीन लाख रुपये लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चंदन नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी सर्जेराव शेगर असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेगर हे पुणे पोलीस आयुक्तातील चंदन नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.एसीबी कडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

या बाबत एका व्यक्तीने पुणे एसीबी कडे फिर्याद केली असून तक्रारदार महावितरण विभागात नौकरी करतात. त्यांच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात मीटर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शेगर यांनी सांगितले. तसेच या गुन्ह्याचा तपास शेगर स्वतः करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वर 5 लाख रुपये दिल्यावर पुढील कारवाई होणार नाही असे शेगर यांनी सांगितले. तडजोड म्हणून 3 लाख रुपये मागितले. तक्रारदार कडून 3 लाख रुपयांची मागणी केली. या बाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबी कडे तक्रार केली. 

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेगर यांनी पाच लाख रुपये लाच मागितल्याचे त्यांनी स्वीकार केले. त्यानुसार, एसीबीने शेगर यांच्यावर गुहा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. 
 
 Edited by - Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती