याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास सातीवली ब्रीजवर बजरंग ढाब्यासमोर भीषण अपघात घडला आहे. गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटून गाडी दुभाजक क्रॉस करून पलिकडील मार्गिकेवर गेली होती.
गाडीचा वेग एवढा होता की गाडी दुभाजक क्रॉस करून मुंबईच्या मार्गिगेवर आली. त्यावेळी सिल्वासा येथून एक ट्रक (एमएच ४८ बीएम ५९८९) येत होता. या ट्रकने गाडीला धडक दिली. दरम्यान अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन रुग्णवाहिकेने जखमीपैकी उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला.