मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

रविवार, 19 मे 2024 (13:12 IST)
मुंबई पोलिसांना दादरच्या मॅकडोनाल्डला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल आला.पोलीस अधिकारी व कर्मचारी या कॉल मुळे सक्रिय होऊन तपास सुरु केला आहे. 

रविवारी सकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला दादरच्या मॅकडोनाल्ड मध्ये बॉम्ब स्फोट करण्याचा धमकीचा फोन आला. कॉलर ने सांगितले की तो आज बस मधून प्रवास करत असताना त्याने दोन लोकांना दादरच्या मॅकडोनाल्ड्ला बॉम्बने उडवण्याचे बोलताना ऐकले.  
 
कॉल केल्यानंतर नियंत्रण कक्षाने पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावर पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून कसून चौकशी केली. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संशयास्पद व्यक्तींवर पाळत ठेवण्यात येत आहे. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तपास यंत्रणेने आता गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
 
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये जिथे पंतप्रधान मोदींची रॅली होती तिथे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. रॅलीदरम्यान मोठा स्फोट होईल असे कॉलरने सांगितले होते, परंतु पोलिसांनी तपास केला असता काहीही आढळले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कॉल करणाऱ्याला अटक केली.

Edited by - Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती