या आमदाराची मराठी अभिनेत्रीकडे वारंवार शरीर सुखाची मागणी

शनिवार, 25 डिसेंबर 2021 (15:21 IST)
गोव्यातील आगामी काळातील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे सरकारमधल्या मंत्र्यांवर अतिशय गंभीर असे आऱोप केले जात आहेत. त्यातच
आता पुन्हा एका आमदाराने मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. जागतिक तापमानवाढीशी संबंधित चळवळीच्या कार्यकर्त्या शमिता सृष्टी शर्मा यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे.
गोव्यातील एका आमदाराने मराठी अभिनेत्रीकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करत, मागच्या आठ महिन्यांपासून छळ केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या प्रकरणावर भाष्य केल्यानंतर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी मुख्यमंत्री सावंत आणि आमदारावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला आहे.अभिनेत्री असलेल्या आपल्या मैत्रिणीसोबत ही घटना घडली असून त्यावर आता कायदेशीर कारवाईची मागणी केली असल्याचं शमिता शर्मा यांनी सांगितलं. शर्मा यांच्या ट्विटनुसार, ही अभिनेत्री मूळची पुण्याची असून आमदाराने तिला वारंवार ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. लॉकडाऊन दरम्यान, सदरील आमदाराने अभिनेत्रीला त्याच्या ओळखीच्या एका निर्मात्याकडून एका मराठी चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी त्याने निर्मात्याला देण्यासाठी तिच्याकडून काही बोल्ड फोटोही मागितले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती