राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे.अधिवेशनाची सुरवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाने झाली पण भाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे राज्यपालांनी केवळ एका मिनिटात भाषण आटपून ते सभागृहातून बाहेर पडले.या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या भाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.आणि यामुळे राज्यपाल भाषण थांबवून सभागृहाबाहेर गेले. या घडलेल्या प्रकारावरून आदित्य ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे. “ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा महाराष्ट्रचा अपमान झाला आहे. राज्यपालांनी असं निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे सर्व अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे”,असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.