या रुग्णांना एसटीमध्ये मोफत प्रवास करता येणार

शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (08:53 IST)
सिकलसेल, एचआयव्ही, हिमोफेलियाग्रस्त आणि मूत्रपिंडाच्या आजारात डायलिसिसचा उपचार घेणाऱ्या रुग्णांना एसटीमध्ये मोफत प्रवासाच्या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शिवशाही व वातानुकूलित बसमध्ये मात्र ही सवलत नाही. २०१५ मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली होती. मात्र, त्यांची अंमलबजावणी झाली नव्हती. याआधी २०१५ मध्ये रुग्णांसाठी मोफत एसटी प्रवास सवलतीची घोषणा केली होती. त्यासाठी निधीची अर्थसंकल्पात तरतूदही झाली होती. परंतु १२ नोव्हेंबर २०१८ पर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती