राज्यातील बेरोजगार तरुणानां नाकरीची सुवर्ण संधी आहे. राज्यातील पोलिसांचा ताण कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात सर्वात मोठी पोलिसांची भरती होणार आहे. राज्यात पुढील दोन महिन्यात तब्बल 7000 पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. त्यानंतर काही महिन्यानंतर 6000 पोलिसांची भरती कॉन्स्टेबल पदासाठी होणार आहे.
सध्या राज्यात पोलिसांची अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी पोलिसात नवीन भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पोलिसांची भरती प्रक्रिया पारदर्शपणे राबविली जाणार असून त्यासाठी तयारी करण्यात येत आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.