आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही; ट्विट करत बंडखोर आमदारांचे स्पष्टीकरण

बुधवार, 29 जून 2022 (15:21 IST)
बंडखोर आमदार परत यावेत यासाठी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे. मात्र बंडखोर आमदार मविआतून बाहेर पडा या मागणीसाठी आग्रही आहेत. या वादंगात महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेशी गद्दारी केली आहे असा आरोप शिवसैनिक करत आहेत. यावर आता एकनाथ शिंदे  यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन आमदार शिंदे गटात सामील झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले शिंदे ट्विटमध्ये


कोणत्याही प्रकारचा दबाव आमच्यावर नाही. आम्ही खरतर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच एकनाथजी शिंदे यांच्यासोबत एकत्रित आलो आहोत अस सांगितलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती