अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणे यांनी ट्वीट करत खोचक शब्दात टीका केली होती. आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले होते. याबाबत अजित पवारांनी विचारलं असता, टिल्ल्या लोकांवर बोलायची गरज नाही, त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेनंतर नितेश राणे पलटवार वार केला आहे
लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले आहे. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. तसेच हे सिद्ध झाले की यांना औरंग्यावरची टीका सहन होत नाही. त्यामुळेच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.