राज्यात येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.