पुत्राने प्रेमाच्या नादात खून केला व पित्याने पुत्रप्रेमासाठी कायदा हातात घेऊन पुरावा नष्ट केला...

गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (07:40 IST)
पंचक येथील खून प्रकरणाला वाचा फोडण्यात नाशिकरोड पोलीस यशस्वी झाले आहेत. प्रेमात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्रियसीच्या नवऱ्याचा प्रियकराने अडरानात पार्टीला नेऊन काटा काढला.
 
पुत्राने खून केल्याचे समजल्या नंतर ही, पुत्र प्रेम आडवे आल्याने बापाने पुरावा नष्ट करण्यासाठी मुलाची मदत केली.म्हणून पोलिसांनी पिता पुत्राना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.
 
उपायुक्त राऊत  यांनी सांगितले की, मयत ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (वय 30)याची पत्नी साधना आणि त्यांच्या जवळ राहणारा कार्तिक सुनील कोटमे (वय19) यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. मयत ज्ञानेश्वर याला प्रेम प्रकरण समजेल आणि त्यामुळे फिरणे, बागडने होणार नाही, याची भीती मनात असल्याने  कार्तिक याने त्याचा काटा काढायचा ठरवले.
 
त्या करिता कार्तिक याने पंचक येथील मलनिस्सारन जवळील जंगल भागात  ज्ञानेश्वर गायकवाड याला पार्टीसाठी बोलावून दारू पाजून त्याच्या छातीवर, पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला.कार्तिक याने घाबरून वडील सुनील पोपट कोटमे याला या बाबत सांगितले. त्याने मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी त्याचे पुत्रप्रेम त्याला आडवे आले आणि त्याने कार्तिकने मारून टाकलेल्या ज्ञानेश्वर गायकवाड याच्या मृतदेहावर घरी ओटा बनवण्याच्या कामासाठी आणलेले सिमेंट रिक्षात नेऊन पसरून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
 
आठ दिवसांनी खुनाची उकल झाल्याने  वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांनी क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करीत प्रियकर कार्तिक आणि त्याला पुरावा नष्ट करण्याची मदत करणारा त्याचा बाप सुनील कोटमे यांना अटक केली असून गुन्ह्याचा तपासात आणखी काही संशयित असल्यास त्याना ताब्यात घेतले जाणार असल्याचे उपायुक्त राऊत म्हणाल्या.यावेळी साहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, साह्ययक पोलीस निरीक्षक हेमंत फड आदी उपस्थिती होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती