खरीप पिके व हंगामाबद्दल जाणून घेऊया खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात ०.४८ लाख हेक्टरची वाढ रिपोर्ट

मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (13:55 IST)
जसं की आपणांस ठाऊक आहे की,आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे व भारताची जवळपास ७०% जनसंख्या ही शेती व शेतीनिगडित कामाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंधित आहे.शेती हा जीवन जगण्यासाठीचा प्राथमिक  व्यवसाय आहे.शेती ही एक अशी प्राथमिक गतिविधी आहे
 
ज्यात मनुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नाची गरज भागवली जाते.शेती म्हणजे, अन्न, गवत, कापडाचे तंतू, प्राणी, मध तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन. पिकांची लागवड प्रामुख्याने हवामान आणि मातीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पिकांची लागवड ही तीन हंगामात विभागली गेली आहे ते तीन हंगाम म्हणजे खरीप, रब्बी आणि उन्हाळी. आज आपण या लेखात या तीन हंगामाविषयीं व त्या हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांविषयी जाणुन घेणार आहोत.
 
पिकांचे प्रकार
खरीप (पावसाळी)हंगाम:
पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारी पिके. महाराष्ट्रात सर्वात जास्त खरिपाचे क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
भारतीय उपखंडामध्ये खरीप पिके ही जून-जुलैमध्ये पेरणी केली जातात आणि ऑक्टोबरच्या आसपास काढले जातात.
 
खरीप पिके,पावसाळी पिके किंवा शरद ऋतूतील पिके पावसाळ्यात पिकविली जातात.पावसाळ्याच्या सुरूवातीला शेतकरी बियाणे पेरतात आणि हंगामाच्या शेवटी त्यांची कापणी करतात,म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान. खरीप पिकांना योग्य वाढीसाठी भरपूर पाणी आणि उबदार हवामान आवश्यक आहे.
 
नवी दिल्ली : देशातील खरीप पिकांच्या पेरणीखालील क्षेत्रात ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.४८ लाख हेक्टरची वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत खरीप पिकांच्या पेरणीखालील एकूण क्षेत्र १०८८.५० लाख हेक्टर होते, तर गेल्या वर्षी या दिवसापर्यंत खरीप पिकांच्या पेरणीखालील एकूण क्षेत्र १०८८.०२ लाख हेक्टर नोंदवले गेले होते. मध्य प्रदेशात ८ सप्टेंबरपर्यंत कडधान्य पिकांच्या पेरणीत ३.७२ लाख हेक्टरवर घट झाली असली तरी राजस्थानमध्ये १.३१ लाख हेक्टरवर कडधान्य पिकांची पेरणी वाढली आहे.
 
कृषी मंत्रालयानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८ सप्टेंबरपर्यंत देशात कडधान्य पिकांचा पेरा कमी झाला आहे. या वर्षी ८ सप्टेंबरपर्यंत कडधान्य पिकांची एकूण पेरणी ११९.९१ लाख हेक्टर होती, तर गेल्या वर्षी या तारखेपर्यंत १३१.१७ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्य पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी ८ सप्टेंबरपर्यंत देशात ४०३.४१ लाख हेक्टरवर भाताची पेरणी झाली आहे, तर गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ३९२.८१ लाख हेक्टरवर भाताची पेरणी झाली होती. मध्य प्रदेशात ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत १.४८ लाख हेक्टर अधिक क्षेत्रात भाताची पेरणी झाली आहे, तर राजस्थानमध्ये भात पेरणीचे क्षेत्र दहा हजार हेक्टर अधिक आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती