हॉटेल 'द ललित'मधील गुपित रविवारी उलगडणार

बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (15:26 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  आणखी एक ट्विट करत सूचक इशारा दिला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी सूचक इशाराही दिला आहे. मलिक यांनी 'द ललित' हॉटेलचा उल्लेख करून केलेल्या नव्या ट्वीटमुळं ड्रग्ज प्रकरणातील सस्पेन्स कमालीचा वाढलाय. हॉटेल 'द ललित'मध्ये अनेक गुपितं दडल्याचा दावा करून रविवारी भेटूया असं मलिकांनी ट्विटमध्ये म्हटलंय. त्याआधी नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंआहे. “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे”
 
दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटवर भाजपचे मोहित भारतीय यांनी रिट्विट करत प्रतिउत्तर दिलं आहे. अब बात निकलेगी तो फिर दूर तलकही जायेगी, अब डरो मत भागो मत, तुम्हारे हर पाप का सवाल पूछा जाए गा! असं ट्विट करत मोहित भारतीय यांनीही इशारा दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती