त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय, "छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता."
संभाजीराजे यांनीही यानंतर हा विषय संपला असल्याचं म्हटलं आहे.
त्यांनी ट्वीट करत म्हटलं, "आताच गृहमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीच्या ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. पण त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसं केलं असावं."
छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर दौरा करत आहेत.
यादरम्यान त्यांनी आज (31 मे) ट्वीट करत म्हटलं, सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.