महाराष्ट्रातील कोरोनाचा नवा स्ट्रेन हा जास्त घातक

सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (13:21 IST)
महाराष्ट्रातील कोरोनाचा नवा स्ट्रेन हा जास्त संक्रमक आणि घातक सिद्ध होऊ शकतो. नवा स्ट्रेन कोरोनातून बर्या झालेल्या व्यक्तीला पुन्हा बाधित करु शकतो. अशा लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या असल्या तरी त्यांना बाधा होऊ शकते, असे एम्सचे प्रुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
 
हर्ड इम्युनिटी तयार होण्यातील अडचणींबाबत ते म्हणाले, कोरोना विषाणूचे नवे म्यूटेशन किंवा स्ट्रेन विषाणूप्रती शरीरात होणार्या  प्रतिकारक क्षमतांमधून वाचण्यासाठी स्वतःच रस्ता शोधतात. असे स्ट्रेन लसीच्या माध्यमातून प्रतिकारक क्षमता प्राप्त करणारा किंवा कोरोनातून सावरण्यासाठी अँटीबॉडीज घेणार्या् व्यक्तींनाही पुन्हा बाधित करु शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोविड-19 प्रती पूर्वीपेक्षा जास्त सतर्कता बाळगली पाहिजे. दरम्यान, महाराष्ट्रमधील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी राज्यात कोरोनाचे 240 नवीन स्ट्रेन दिसल्याचे सांगून मागील आठवड्यापासून महाराष्ट्रात वाढलेली रुग्णसंख्या मागील महत्त्वाचे कारण असल्याचे मानले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती