मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील थंडीचा जोर ओसरल्याचे चित्र दिसतेय, मागील दोन दिवसांपासून राज्यातील थंडीचा पारा कमी झाला आहे. यात अनेक शहरातील तापमान वाढ असल्याने गारठा कमी झाला आहे आणि काहीसा उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात थंडीचा जोर कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात गेल्या आठवड्यात पारा 10 अंशांच्या खाली पोहचला होता तो आता 15 अशांच्या घरात नोंदवला जात आहे. त्यामुले राज्यातील बहुतांश जिल्ह्यात डिसेंबर महिन्याची सुरुवातचं ढगाळ वातावरणाने होणार असून थंडीची तीव्रता कमी होईल. त्यानंतर राज्यात थंडीची लाट येऊ शकते. 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत राज्यातील वातावरण ढगाळ असेल.