नशेबाज मुलींचा मुंबईत गोंधळ उगारला पोलिसांवर हात

बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (16:25 IST)
पुरुष नशा करतात हे सर्वश्रुत आहे. त्यात ते गोंधळ सुद्धा घालतात, मात्र महिला फारच कमी प्रमाणात असे करतात, असाच मोठा प्रकार मुंबई येथे घडला आहे. मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या ४ तरुणींनी पोलिसांवरच हात उगारल्याची संतापजनक घटना भाईंदरमध्ये घडली. तरुणींनी पहाटेच्या  सुमारास मद्यधुंद अवस्थेत भाईंदर येथील मैदानात गोंधळ घातला आहे. पोलीस या तरुणींना शांत करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला आहे. पोलिस कारवाई करत होते मात्र या मुलीनी पोलिसाच्या हातातील लाठीकाठी हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तिघींना अटक केली आहे. यामध्ये  ममता मेहर (वय २५), आलिशा पिल्लाई (वय २३), कमल श्रीवास्तव (वय २२) आणि जस्सी डिकोस्टा (वय २२) अशी या आरोपी तरुणींची नावे आहेत. या चौघींनी मीरारो़ड येथे रात्री जोरदार पार्टी केली होती. मध्यरात्र उलटून गेल्यावर रात्री दोनच्या सुमारास त्या भाईंदरमधील शहीद भगतसिंग मैदानात आल्या होत्या. काही कारणानं एकमेकींमध्ये जोरदार भांडण सुरु झाल्यानंतर मोठी गर्दी जमा झाली. गोंधळ वाढल्यामुळे रात्रीच्या गस्तीवर असणारे तीन पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा पाटीलही होत्या. पोलीस या तरुणींना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी पोलिसांनाच शिवीगाळ करत पोलिसांच्या हातातील लाठीकाठी काढून घेऊन त्यांनाच मार दिला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केली आहे. पोलीस समजावत होते मात्र कोणीही लक्ष देत नव्हते. तिघींना पोलिसांना अटक केली असून डिकोस्टा तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. या चौघींपैकी फक्त डिकोस्टा एकटी नालासोपारा येथे राहते. अन्य तीन तरुणी मीरा रोड येथे रहायला आहेत. पोलिसांनी या चौघींविरोधात भा. दं. वि. कलम ३५३, ३३२ आणि ५०४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती