भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण

मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (20:45 IST)
भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला आता कापरं भरणार आहे. तसेच, भारताविरोधात कुरघोड्या करण्यापूर्वी पाकिस्तानला आता एकदा नाहीतर 10 वेळा विचार करावा लागणार आहे. कारण जम्मू काश्मिरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे. याच पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी जम्मू-काश्मिरमधील कुपवाड्यात दाखल झाले आहेत.
 
भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉर्डर टुरिझमची संकल्पना मांडली होती. त्या योजनेअंतर्गत छत्रपतींचा पुतळा भारत-पाक सीमेवर स्थापीत करण्यात आला आहे.
 
41 राष्ट्रीय रायफल मराठा एन. आय आणि आम्ही पुणेकर ही संस्था आणि त्यासाठी एकत्र आले आहेत. शत्रूशी लढणाऱ्या जवानांना महाराजांचा आदर्श, पराक्रम कायम डोळ्यासमोर रहावा यासाठी ही प्रतिकृती स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. जम्मू काश्मीर मध्ये, भारत पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्याचे काम पूर्ण झाल आहे.
 
7 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होत आहे. सुधीर मुनगंटीवार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकाला यावर्षी 350 वर्षे पूर्ण झाली. याच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भारत-पाक सीमेवर स्थापीत होत आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचा उर अभिमानाने भरून येणारा हा दिवस असेल.
 
पुतळा उभारण्याची घोषणा करण्यापूर्वी काय म्हणालेले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल."
 



Edited By - Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती