पाणी पाणी करणार पीक करपताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले मग हताश होऊन पपई पिकात रोटावेटर फिरविला

मंगळवार, 26 एप्रिल 2022 (11:13 IST)
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील बोरी ईजारा येथील शेतकरी परशुराम गंगाराम डवरे यांच्याकडे 7 एकर शेती त्यात 4 एकर टरबूज आणि 2 एकर पपई 1 एकर वर अन्य पीक त्यांनी घेतले मात्र आताच्या भारनियमनचा त्यांच्या शेतातील पिकांना फटका बसला संपूर्ण शेतातील पिकांना या ऐन रखरखत्या उन्हाळ्यात पाणी योग्य प्रमाणात पिकांना पाणी देता येत नसल्याने पाणी पाणी करणार पपई पीक गळू लागलं करपू लागलं आणि त्यामुळे गतप्राण होणार झाड पाहून त्यांनी नाईलाजाने शेतात रोटावेटर चालविला

मागील वर्षी परशराम डवरे यांना याच शेतात पपईचे मोठं उत्पन्न घेत त्यातून नफाही मिळविला तो अनुभव पाहता त्यांनी मागील वर्षी एप्रिल महिन्यात ताईवान जातीच्या पपईची शेतात लागवड केली मात्र मागील वर्षी 24 तास मिळणारी वीज यंदा केवळ 8 तास मिळू लागली ती सुद्धा रात्री 1.30 वाजता त्यामुळे पिकाला फटका बसतोय अशात संपूर्ण 7 एकर मध्ये ओलित करणे कठीण झाले त्यामुळे त्यांनी अगतिक होऊन नाईलाजाने त्यांच्या पपईच्या बागेत त्यांनी रोटावेटर चालवुन पीक काढून टाकले आहे.
 
शेतकऱ्याला किमान 12 तास वीज मिळावी अशी अपेक्षा आहे मात्र अनियमित वीज पुरवठा यामुळे नाईलाजाने हे पीक जमीनदोस्त करावं लागलं असे परसराम डवरे यांनी म्हटले या भागातील शेतकऱ्यांना वेळेत वीज मिळावी असे या भागातील शेतकरी नेते म्हणत आहे तसे न झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरू अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी घेतली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती