असं म्हणतात की लग्नाची गांठ देवाने बांधलेली असते. याचे प्रत्यक्ष उदाहरण सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणाच्या मलकापूर पांग्रा येथे घडले आहे. या ठिकाणी नवरीने लग्नमंडपात वरमाला नवरदेवाच्या ऐवजी दुसऱ्याच्या गळ्यात घालून त्याला आपले जोडीदार म्हणून निवडले. नवरदेव डीजेच्या तालावर आपल्या मित्रांसह नाचण्यात इतका बेभान झाला कि त्याला आपलेच लग्न आहे आणि नववधू लग्नाच्या मुहूर्तावर त्याची वाट बघत आहे. लग्न मंडपात उशिरा पोहोचल्याने चक्क एका नवरदेवाला वधू गमाविण्याची वेळ आली. आणि वधूपक्षाच्या लोकांनी हे लग्न मोडून मुलीचे लग्न दुसऱ्या मुळाशी लावून दिले.
झाले असे की मलकापूर पांग्रा येथील मुलीचे लग्न कंडारीच्या तरुणा सोबत ठरले दोघांचा शुभ विवाह 22 एप्रिल रोजी करण्याचे योजिले. लग्नाचा मुहूर्त दुपारी 3:30 चा होता. मात्र वऱ्हाडी येणास विलंब झाला. त्यामुळे पुढील सर्व धार्मिक विधी होण्यास उशीर झाला. एवढेच नव्हे नंतर लग्नापूर्वी देवाच्या पाया पाडण्यासाठी नवरदेवाची वरात निघाली. त्यात नवरदेव डीजेच्या तालावर बेभान होऊन मित्रांसह नाचत होता. दुपारी 3:30 ला लागणारे लग्न चार ते पाच तास उशिरा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली.
अखेर मुलीकडील मंडळीने लग्न मोडून मुलीला मंडपातील दुसऱ्या अळशी लग्न करायला सांगितले आणि मुलीने चक्क नवरदेव ऐवजी दुसऱ्या मुलाच्या गळ्यात वरमाला घातली आणि लग्न केले. नाचून झाल्यावर वऱ्हाडी लग्न मंडपात आल्यावर मुलीकडील मंडळींनी लग्नास येणास उशीर का केलास? विचारल्यावर दोन्ही पक्षात वादावादी झाली. नंतर मुलीच्या नातेवाईकांनी नवरदेवाला लग्न न करता परत जाण्यास सांगितले अखेर नवरदेवाला लग्नाशिवायच परत यावे लागले.