भारत निवडणूक आयोगा कडून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर
गुरूवार, 9 मे 2024 (00:30 IST)
भारत निवडणूक आयोग कडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघ अशा 4 जागांवर निवडणूक होणार असून येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी बुधवार 15 मे रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार 22 मे पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी शुक्रवार 24 मे रोजी केली जाईल.तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार 27 मे आहे.
येत्या सोमवारी 10 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 च्या वेळेत या चार मतदार संघासाठी मतदान होईल. या मतदानाची मतमोजणी गुरुवार 13 जून रोजी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 18 जून रोजी पूर्ण होईल. भारत निवडणूक आयोगाने हे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.