औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव नामांतर करण्याचा शिंदे मंत्रिमंडळाचा निर्णय

शनिवार, 16 जुलै 2022 (12:58 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला.ठाकरे सरकार ने शेवटच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयाला शिंदे सरकारनं स्थगिती दिली होती. त्या निर्णयावर निर्णय घेत शिंदे- फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव  धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या निर्णयावर पुननिर्णय घेण्यात आला. या सदंभात लवकर ठराव करून प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवले जाणार अशी माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अल्पमतात असताना नामांतराचे निर्णय घेणे अयोग्य आहे. ज्या सरकारकडे बहुमत ते सरकार निर्णयांना मंजुरी देईल.असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी या निर्णयावर स्थगिती  दिली होती. कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतले जाण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती