मॉल, मल्टिप्लेक्समध्ये होणारी पार्किंगची लुट थांबणार पुण्यात मनपाचा निर्णय

शनिवार, 15 जून 2019 (10:27 IST)
शहरातील एकाही मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणा-या ग्राहकांना यापुढे कोणत्याही स्वरुपाचे पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नये, असा ठराव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. यामध्ये बेकायदेशीरपणे नागरिकांकडून पार्किंगशुल्क वसूल करणा-या सर्व मॉल, मल्टिप्लेक्सला नोटीसा देण्याचे आदेश देखील शहर सुधारणा समितीच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आले. यामुळे आता लवकरच पार्किंग मोफत होणार असून लाखो रुपयांची लुट थांबणार आहे. 
 
न्यायालयाच्या निर्णयानुसार मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणा-या सर्व ग्राहकांना पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे. परंतु पुणे शहर आणि परिसरातील सर्वच  मॉल, मल्टिप्लेक्समध्ये ग्राहकांची लुट करत लाखो रुपये वसूल करतात. ५ रुपयांपासून ५० रुपये, १०० रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क आकारणी केली जात आहे. मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणा-या ग्राहकांना मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित व्यावस्थापकांची असते. याबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिला आहे. त्यानंतर देखील शहरातील मॉल, मल्टिप्लेक्सकडून अनधिकृतपणे पार्किंग शुल्क वसुल केले जात आहे. यामध्ये कोर्टाने आदेश दिले असून त्यामुळे पुणे नंतर राज्यात इतर ठिकाणी सुद्धा ही लुट थांबणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती