राहत्या घरात नजरकैदेत ठेवण्याची सचिन वाझेंची मागणी न्यायालयानं फेटाळली
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (12:12 IST)
सचिन वाझेंना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. आपल्या राहत्या घरात नजरकैदेत ठेवण्याची वाझेनं केलेली मागणी विशेष एनआयए कोर्टानं फेटाळून लावली आहे.
बायपास सर्जरी झाल्यामुळे तीन महिने घरीच नजरकैदेत ठेवण्याची मागणी करणारा वाझेंचा अर्ज एनआयएच्या विरोधानंतर कोर्टानं फेटाळून लावला. तसंच वाझेंना वॉकहार्ट हॉस्पिटलमधून आता जेलच्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची परवानगीही कोर्टानं दिली आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझेंनी सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात नव्यानं अर्ज दाखल केला होता.
ओपन हार्ट सर्जरी झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत आपल्याला घरातच नजरकैदेत ठेण्यात यावं, अशी मागणी या अर्जातून कोर्टाकडे केली होती.